अहिराणी म्हणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अहिराणी म्हणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२५ सप्टेंबर २०१५

अहिराणी म्हणी - बहिणाबाईन्या म्हणी




  • दया नही मया नही, डोयाले पानी गोगलगायच्या दुधाचं काढा वो लोनी
  • केसावार रुसली फनी, एकदा तरी घाला माझी येनी
  • कर्‍याले गेली नवस, आज निघाली आवस
  • आग्या टाकीसनी चुल्हा पेटत नही, टाया पिटीसनी देव भेटत नही
  • पोटामधी घान, होटाले मलई, मिय्याच्या तांब्याले भाइरून कल्हई
  • तवा खातो भाकर, चुल्हा भुकेला, पव्हारा पेतो पानी, राहाट तान्हेला
  • मानसानं घडला पैसा पैशासाठी जीव झाला कोयसा
  • मानूस मोठा हिकमती, याचं घोंगडं त्याच्यावर दगडाचा केला देव शेंदूराच्या जीवावर
  • डोयाले आली लाली चस्म्याले औसदी लावली
  • वडगन्याले ठान नही घरकोंबड्याले ग्यान, नही घरजवायाले मान नही
  • म्हननारानं म्हन केली जाननाराले अक्कल आली

१४ मे २०१२

अहिरानी म्हणी

  • घरना पोरं उघडा, नी याहीणले नेसाडा लुगडा
  • चार आनानी कोंबडी, नी बारा आनाना मसाला
  • दळे तिले कळे, नी फुकटी गोंडा घोळे
  • खिंसात नही आणा, नी माले बाजीराव म्हणा
  • नवल्यानी घीदी गाय, नी धाई धाई दुध काढले जाय
  • खिशात नही कवडी, नी वणी बाजार भवडी.
  • जीव म्हणे आखो आखो, नी पोट म्हणे नको नको 
  • चार आनानी पेवाणी, नी बारा आनानी दखाडानि
  • येडी न मत, नी घुबड न चाळा.