अहिराणी लोककथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अहिराणी लोककथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१८ मे २०१२

अहिराणी लोककथा - लक्षुमी आन अवदसा

लक्षुमी आन अवदसा या दोन बहिनी. दोनीस्ले शेजारशेजारना घरस्मा देयेल व्हतं.
लक्षुमीनं घर मोठं-शिरीमंत, एकत्र कुटुंब. मोठी शेतीवाडी, डाळिंबना बागं आन द्राक्षास्ना मळा. रामपारात उठीसन लक्षुमी कामले लागे. दारना आडे ठेयेल कुंचा काढीसन सरं घर झाडे. आंगनमा सडारांगोळी काढे. मंग सरास्ले न्ह्यारी आन पोर्‍यास्नी तयारी. मंग दुपारनं जेवण. मंग धान्य पाखडनं, निवडनं, सुनं. मंग सैसानले दळा-भयडाना-पाखडाना कामं. रातना सयपाक लगेच सुरू. रातपावत बिचारी दमे जाये. हाई सरं सासू-सासरा, देर-ननंदा, नवरा-सालदारं-गडीमान्सं.. सरास्ले समजे. घरनास्ना दोन गोड शब्द मिळनात, नवराकडतीन गोड इचारपूस व्हयनी, का मंग तिले कयेल कामनं काईच वाटेना. शांत झोप लागनी, का मंग दुसरा दिवस रामपारात उठाले बळ येये. इतला मानसं र्‍हाईसनबी या घरात भांडन-कजा व्हयेना. सरा आनंदीआनंद आन गोकूळनं राज्य.

 अवदसानं सरंच उलटपाल्टं. कासराभर ऊन येयेस्तोवर झोपी र्‍हाये. काम करानी सवयच नव्हती. आन गंदाबुरा विचारस्मातून सवडबी नव्हती तिले. कुंचाबी हातमा धरता येयेना, ते काम कसाले सांगी कोन..? चुकीमाकी कोनी सांगंच, ते वाचाळ तोंड करे सर्रास्वर. तिले घाबरीसन कटकट नको, म्हनीसन सरा लोक आपापला कामं करी लेयेत. पन इतलं राबीसनबी त्यास्ले मळा फळेना, खडकू मिळनात.
लक्षुमीना घर पैसास्ना पाऊस, आन लक्षुमी दागिनास्नी मढेल. अवदसाले हाई काई बरं वाटेना. दिनभर लक्षुमीवर जळी र्‍हाये. डोकं चालाडी पार थकी गयी ती, पन यावर तिले इलाज सापडेना.
अवदसानासारखीच तिनी ननींद. एक दिन ननींद तिले बोलनी- लक्षुमीना घरमा भांडनकजा घालूत. हाऊ एकच रस्ता शे घर बिगाडाना. तिना घरमा घुसानं सादंसोपं नई. त्यानाकरता एक काम तुले करणं पडी. नीट आयक. लक्षुमीना घरना कुंचा कायम दरूजाना आड दडेल र्‍हास. तो कुंचा जवळ बाहेर पडेल दखायना, तवळ त्यावात तू जाय. आन सरं घर झाडीसन त्यास्ले उलटंपालटं करी टाक. तिना घरमा घुसाना, घरना पूरा बारा वाजाडाना हाऊ एकच रस्ता शे.