०१ ऑगस्ट २०१७

दुनियादारी

गावं तुम्हन ..! दादा भलतं जहरी शे
करतसं गुन्हा राजरोस तरी नैयी देखत कोणी,..दुनिया सारी अंधी बहीरी शे....
अब्रु लुटास भरे बजार माय माऊली नी
जठे तठे सैतानस नं राज शे....;
भेटस का कोठे..? न्याय मोठ्ठला मोर्चा
काढीसनी...! ,समदा मतलब ना चोर सेत.
रोज मरी रहायना शेतकरी कर्ज बजारी
व्हयीसन कोणले त्यान्हा मरणन मोल शे.. ;
त्या काढी रहायनात रोज ए.सी. गाडी म्हा बसीसन शिवार फेर्या , यास्ले शेती मधलं काय तित्तुर कयनार शे..
डल्ला मारी रहायनात त्या गरीब नी थाटी म्हा त्यान्हा परीस कुत्रं बरं शे..;
कोणी रहायनं नयी गरीबना वाली
आठे मरणं पेक्षा जगणं महाग शे...
आठे मरण पेक्षा जगणं महाग शे..

 जयराम सिताराम मोरे
एकलव्य चौक सोनगीर ता.जि धुळे .


देसप्रेमी माय

देसप्रेमी माय 
उठ उठ सुनबाई ल्हेव आरतीनं ताट ;
आज लढाई वर निंघना तुन्हा पतीराज..
नको बसु कोपराम्हा तु अशी रडीकुढी,
लाज भारतमायनी राखाले निंघेल से
हाऊ विर गडी...
व्हत कुंकू कपाय नं मन्ह
देश ना काम ले उन ;
हायी तेन्हच से रगत कशी बुडायी,
कुळ नी शान ...
शे एकुलता एक लाल मन्हा ,
जिव मन्हा बी तुटसं ;
पण..! सेवा जन्म भु नी कराले
मोठ्ठ भाग्य लागस...
कर भरजरी सोया  सिंगार
जसं भवानी नं रुप....;
हासी सन काढ ईडापिडा,
तेल्हे लढाले य्हीन हूरुप..
करीसन आकांत तोडु नको
त्यान्ही हिम्मतं...
उपकार धरत्रीना फेडाले त्याल्हे
मोजानी से किंमतं..
पडनी से देस वर दुश्मन वैरी नी नजर ;
कालीज तेन्ह आणिन  चिरीसन
मन्हा शुर सरदार..
म्हणु दे दुनिया ले आपुनले करंट्या ; हारना मन्हा लेक ते लढाई वर जासुत आपण दोन्ही स्वःत्या...

 जयराम सिताराम मोरे
एकलव्य चौक सोनगीर ता.जि धुळे .