अहिराणी संस्कृती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अहिराणी संस्कृती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१८ मे २०१२

बहिणाबाई

बहिणाई

 

 “माझी माय सरसोती, मले शिकवते बोली”

“स्वतंत्र भारती अता, तुझेच रुप पाहू दे…
जुने पणास त्याजिता, वसुंधरा नवी कळा
मनामनात आगळ्या नवीनता समावुदे !!
दिवाकरा, मिषे तुझीच दिव्य दर्शने किती
कणाकणातली श्रुती जनाजनात ते नेऊ दे !!
नभी दयार्द्रता तुझी. धरेत नित्य पाझरे
परात्परा असाच रे, झरा अखंड वाहू दे !!

किती साधे शब्द, किती साधी रचना.. पण चराचराचं कल्याण मागणारी रचना ! जणू ज्ञानदेवाने मागितलेल्या पसायदानाचा उत्तरार्धच ! साधेपणा या माणसाच्या लेखनातच नव्हे तर स्वभावातही काठोकाठ भरलेला होता. कुठून आला असेल हा विलक्षण साधेपणा, ही विलक्षण प्रतिभा या माणसामध्ये!

१७ मे २०१२

कानुबाई पिवळा पीतांबर नेसणी ओ माय!


श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. त्याला तु'झ्या नावाची म्हणजे "खानबाई' साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं , हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी 'कानबाई' हे नाव घेतलं असावं. असो. हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी या समाजात साजरा होतो.
या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते. तेही चक्कीवालीला आधी सांगुन ( तो मग चक्की धुवुन पुसुन ठेवतो.) चक्कीवरुन दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य. साड्यांचे पडदे लावुन डेकोरेशन केले जाते. कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते.

१५ मे २०१२

अहिराणीची प्रकाशित पुस्तके





Author : M. S. Naravane
Publication : Palomi Publications, 1997 - 131 pages
लेखक : डॉ. रमेश सूर्यवंशी
प्रकाशक : अभ्यासिका प्रकाशन, कन्नड

लेखक : डॉ. रमेश सूर्यवंशी
प्रकाशक : अभ्यासिका प्रकाशन, कन्नड

खानदेशातील म्हणी (वर्गीकारानात्मक)
लेखक : डॉ. रमेश सूर्यवंशी
प्रकाशक : अभ्यासिका प्रकाशन, कन्नड

  
लेखक: डॉ.सुधीर देवरे
प्रकाशक:  ग्रंथाली प्रकाशन

‘अहिराणी म्हणी : अनुभवाच्या खाणी’लेखक :
लेखक : प्रा. डॉ. बाळासाहेब गुंजाळ,
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन

अहिराणी वाग्वैभव -अहिराणी म्हणी, वाक्यप्रचार, आन्हे व लोककथा
लेखक: प्रा. अभिमन्यू पाटील 
प्रकाशक: कस्तुरी प्रकाशन

अहिराणी लोकगीतातील लोकतत्व, इहवाद आणि लोकभाषा
लेखक: म. सु. पगारे  

प्रकाशक: प्रतिमा प्रकाशन


अहिराणी म्हणीतील समाजभाषा 
लेखक: म. सु. पगारे  

प्रकाशक: प्रतिमा प्रकाशन


ताई मी कलेक्टर व्हयनु !
लेखक: राजेश पाटील
प्रकाशक: ग्रंथाली

Ethnobotany of Jalgaon District, Maharashtra

लेखक : शुभांगी पवार
प्रकाशक : दया पब्लिशिंग हाउस 

खानदेशातील आहिराणी स्त्री गीते 
लेखक  : उषा सावंत  
प्रकाशक  :प्रतिमा प्रकाशन


 

१४ मे २०१२

लग्न पद्धती, चालीरिती, लग्नातील गाणी

खान्देशी लग्नात लगिनघाई लग्नतारखेच्या आठ दिवस आधीपासुन सुरु होते. सुरुवातीला पितरांना मान दिला जातो. ज्या घरी लग्न आहे तिथे आधी पितर व सवाष्ण जेऊ घातले जातात नंतर देवाचे कार्यक्रम सुरु होतात त्यात पाच सवाष्णींनी मिळुन गव्हाची रास पुजणे नंतर पाच सवाष्णींच्या हस्ते हळद फोडणे, खंडोबाचे अष्टीवर जेऊ घालणे, सोनाराकडे दिलेले देव आणण्यास वाजत गाजत जाणे(हे बहुधा वराची / वधुची बहिणे मेव्हणे जातात), कुलदेवतेचा कुळाचार म्हणजे कुळधर्माच्या आरत्या इ., देवांना आमंत्रण, तेलन पाडणे, लग्नाच्या हे विधी अगदी लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत होतात.
या प्रत्येक विधीच्या वेळेस बायका गाणी म्हणतात. एक वयस्क बाई आधी एक ओळ म्हणते, तिच्या मागुन सगळ्या बायका कोरस धरतात. खाली मी एकेक गाणं आणि त्यांचा जरुर तिथे अर्थही देत आहे.

 हळद फोडायच्या वेळेस म्हणावयाचे गाणे:

अहिरानी म्हणी

  • घरना पोरं उघडा, नी याहीणले नेसाडा लुगडा
  • चार आनानी कोंबडी, नी बारा आनाना मसाला
  • दळे तिले कळे, नी फुकटी गोंडा घोळे
  • खिंसात नही आणा, नी माले बाजीराव म्हणा
  • नवल्यानी घीदी गाय, नी धाई धाई दुध काढले जाय
  • खिशात नही कवडी, नी वणी बाजार भवडी.
  • जीव म्हणे आखो आखो, नी पोट म्हणे नको नको 
  • चार आनानी पेवाणी, नी बारा आनानी दखाडानि
  • येडी न मत, नी घुबड न चाळा.