०६ जानेवारी २०१६

अहिराणी चारोळ्या


भस्टाचारना पायरे,
शेतकरी गया हारी...
जवय शेतकरी पिकाडाव नही,
तवय बठ्ठा जातीन हारी...
-------------------------------------------------------
गाडी मा बठीसन,
नेता मोठासक्या करतसं....
तेसनं कर्मानं फय,
मंग खाले मान टाकी भरतस..
-------------------------------------------------------
वावरकडे दखीसन,
बिचारा शेतकरी गयरा रडे...
बाराही महिना बिचारा,
गरिबीना झुडुपमाज सापडे...
-------------------------------------------------------
माय - बाप ना शिवाय,
खोटी शे गोट...
जेना माय - बाप नही,
दुन्याना त्या बिचारावर बोट...
-------------------------------------------------------
एक दिन माय गाव जास,
ते आख्खा दिन बोर वाटसं...
जेसना माय-बाप नही शेत,
त्या बिचारा कसा रातस...
-------------------------------------------------------
बापनी याद ऊनी,
त्या राखले दखीसन...
प्रणाम करस पप्पा,
पायवर डोकं टेकीसन...
-------------------------------------------------------
थंडी ऊनी, थंडी ऊनी,
ढुमाया,
जेन - तेन्या गोधळ्या समाया...
-------------------------------------------------------

📓कवीकुमार तुषार पाटील.
ज्ञानेश्वरत्न साहित्य कला मंच,
निंभोरा, ता. धरणगाव
जि. जळगाव

मायनं माहेर...

मायना माहेरनी गोडी |
माय येस माहेरमा सोडी ||
कसं वाटस तुना मनले |
माले सांगना वय माळी ||१||

याद येस का वयं तुले |
तुना माहेरनी माती ||
सांग, कशी निभावस तु |
आपली नाती आणि गोती ||२||

मना बापना संसारसाठे |
करा तु माहेरना त्याग ||
सांग, या सासरवासना |
तुले येस नही का वय राग ||३||

राखीपुणी नी भाऊबीजशिवाय |
देखस नही तु माहेरन तोंड ||
या सासरवासनी शे |
तुना मांगे एकसारखी सोंड ||४||

तुना एकटा जीवमुळे |
चालसं हाई खटलं ||
तुना एकटी शिवाय |
कोनं हालसं नही पाटलं ||५||

माय, कशी निभावस तु |
एवढा मोठ्ठा संसार ||
तुना चेहरावर देखी नही |
मि कधीन दुःखानी हार ||६||

📓कवीकुमार  तुषार पाटील.
ज्ञानेश्वरत्न साहित्य कला मंच, निंभोरा ता. धरणगाव जि. जळगाव..........
मो. ७७२१८६६६३२

२५ सप्टेंबर २०१५

अहिराणी म्हणी - बहिणाबाईन्या म्हणी




  • दया नही मया नही, डोयाले पानी गोगलगायच्या दुधाचं काढा वो लोनी
  • केसावार रुसली फनी, एकदा तरी घाला माझी येनी
  • कर्‍याले गेली नवस, आज निघाली आवस
  • आग्या टाकीसनी चुल्हा पेटत नही, टाया पिटीसनी देव भेटत नही
  • पोटामधी घान, होटाले मलई, मिय्याच्या तांब्याले भाइरून कल्हई
  • तवा खातो भाकर, चुल्हा भुकेला, पव्हारा पेतो पानी, राहाट तान्हेला
  • मानसानं घडला पैसा पैशासाठी जीव झाला कोयसा
  • मानूस मोठा हिकमती, याचं घोंगडं त्याच्यावर दगडाचा केला देव शेंदूराच्या जीवावर
  • डोयाले आली लाली चस्म्याले औसदी लावली
  • वडगन्याले ठान नही घरकोंबड्याले ग्यान, नही घरजवायाले मान नही
  • म्हननारानं म्हन केली जाननाराले अक्कल आली

कानबाईना गाना - डोंगरले पडी गई वाट

डोंगरले पडी गई वाट,
वाट मन्ही कानबाईले
कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
साडी-चोळीना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई ....
कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
पुजा पत्रीना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई...
कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
फुलेस्ना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई ...
कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
रोटास्ना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई...
कसाना लऊ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
तोरणना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई....


२४ सप्टेंबर २०१५

कानबाईना गाना - गेले होते कुठे गं

सहा महिन्याची रात्र गेली, गेले होते कुठे गं

वाणियाच्या दुकानी मी बसलो होतो तिथे गं

नारळाच्या गोणी मी तो खरेदी केल्या दोन्ही गं

सहा महिन्याची रात्र गेली, गेले होते कुठे गं

वाणियाच्या दुकानी मी बसलो होतो तिथे गं

खारकाच्या गोणी मी तं खरेदी केल्या दोन्ही गं

सहा महिन्याची रात्र गेली, गेले होते कुठे गं

वाणियाच्या दुकानी मी बसलो होतो तिथे गं

लिंबोळ्याच्या गोणी मी तं खरेदी केल्या दोन्ही गं

- अहिराणी साहित्य

कानबाईना गाना - थारा कोठे लेशी वं माय

कानबाई सांगे रानबाईने

थारा कोठे लेशी वं माय

थारा लेसु वारा लेसु

... भाईना घर वं माय

... भाईनं सुर्यामुखी दार

याने बसनं ठाकं दारी वं माय

ठाकं दारी याने मंडप दिला भारी वं माय

- अहिराणी साहित्य

कानबाईना गाना - कानडी उभ्या, दारावरी

 सुर्या निंघना, कानडी  उभ्या, दारावरी

तापी गोमीना मेळ देव चांग्यावरी

सुर्या निंघना कानडी उभ्या, दारावरी

डोकी तांबन्या घागरी भेट गंगेवरी

- अहिराणी साहित्य

कानडी - कानबाई
गोमीना - गोमती नदी

कानबाईना गाना - आई कानबाई

हाऊ काय सरावन महीना वं माय

पान वार्‍यानं उडेल वं माय

आईच्या दरबारी पडेल वं माय

आईने शेल्याने झाकीले वं माय

आईचा सासरा दशरथ वं माय,

आईनी सासु केगामती (कैकयी) वं माय

आईना राम भरतार वं माय, राम भरतार

- अहिराणी साहित्य

अहिराणी गाना - नाचणार पोर्य्या


हे वाकडा - तिकड़ा बाभूळ,

त्यावर होता कोल्हा

कोल्हा मना साला,

चिडी म्हणी सासु,

ढोलग धरी नाचू ,

ढोलग गय फूटी,

नाचणार पोर्य्यान घर कोणत , घर कोणत,

काई कुत्तलिनी दाईदीनथ, कुत्तलिनी दाईदीनथ,

भूरी  कुत्तलिनी भुकिदिन्थ -भुकिदिन्थ


- अहिराणी साहित्य