१५ मार्च २०१८

या जगनी रित न्यारीच शे

या जगनी रितं न्यारीच शे 
कोनले भारी ते कोनले  
प्यारी शे 
कोना वट ते कोनी रट शे 
या जगनी रित न्यारीच शे 

एकन् चांगल व्हस् ते 
दुसराले दखास नै 
मनमा रुतेल सल कोनले 
सागांत नै 
हावु मोठा व्हस ते  
त्याना पोट मा दुखस् 
काहीतरी गासोड सापडनं व्हयी 
म्हन्शीन गावभर दवंडी पिटस 

याले सुखना दिन येतस्  
ते तो नुसता जयस 
त्यानं सुख दखीसन  
हावू कुढापा करस  
कोठेतरी हात मारा व्हई 
आशी याना त्याना जोडे बकस 

कवय मवय चांगला कपडा घालास गाडीवर फिरस ते 
हावू डोया फाडीसन दखस् 
त्याना बदलेल रुबाब दखिसन यानी नजर खालवर फिरस्   

घर मा ऱ्हानारा बगंला मा  
ऱ्हावाले जास  
ते याना आगंनी आगीन व्हस 
दिन रात कष्ट करीसन  
त्याले देवबा मेहनत नं फय देस ते 
हावू चाढी चुगली करीसन लोकेसना कान फुकस 

दुसरानी प्रगती आपुनले  
सैन व्हतं नै 
शेजार पाजारले खोट नाट  
सांगा बिगर पोट भरस नै 
मनं भलं व्हत नै ते  
दुसराले आडा पाय लावाना 
पायले पाय लाईस्नी मंग पाय पडाना 

हाई दुनिया पाये चालु देत नै 
घोडावर बठु देत नै 
दुसरानं चांगल भी व्हवू देतं नै 
आन् चांगल भी दखस नै 
सोता मांगे ऱ्हाईसन पुढे जानार  ना पाय व्हडतस् 
सोताना हाल दखीसन कोपरामा रडतस् 
  
दुसरा काय करस कशा करस 
आपुन काना डोया करिसन दखान नै 
आपला सुख ले दु: मा सोडानं नै 
आपलापान जे शे त्यानामा 
समधान मानानं 
बै चतकोरच खावानी 
पण ईज्जत मा ऱ्हावानं 

कोनं कायपण व्हवू दे  
आपुन दखान नै 
आपुण आपला कष्टानी वाट सोडानी नै 
काम करनारले देव बरोबर देस म्हनिस्नी कोनले वाईट बोलो नै 

आहो कासाना गरीब कासान श्रीमंत कसानी झोपडी  
कसाना बंगला 
कितल् भी कमाडा बठ्ठ सोडी जानपडस् काय संगे येत नै 
वारभर कफना तुकडा भी आंगवर ऱ्हास नै 

तवय जगं ना मांगे मांगे पयान नै 
आपुन आपला आनंद ऱ्हावान 
आपला पोऱ्हे सोऱ्हे आपला परिवार हाईचं आपल धनं से 
यान्हामाचं सुख दखानं 

-संजय धनगव्हाळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा